साटेली येथे “कृष्ण भोजन नाट्यप्रयोग सादर…

कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

⚡दोडामार्ग ता.०५-: श्री देवी माऊली मंदिर साटेली येथे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांचा “कृष्ण भोजन” हा पौराणिक नाट्य प्रयोग पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

साटेली सह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी या नाट्य प्रयोगास उपस्थित राहूननाटकाचा लाभ घेत कलाकारांना दाद दिली.
यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी नाट्य प्रयोग सादर करणारे कलाकार व आयोजक श्री. विजय साटेलकर व समस्त साटेली ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचे शरद मोचेमाडकर, मानकरी नाईक, नंदू साटेलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page