नौदल दिनाच्या कार्यक्रमानिमित्त काल आले होते जिल्ह्यात: भाजपने केली होती जय तयारी…
⚡ओरोस ता.०५-: देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी काल नौदल दिन कार्यक्रमानिमित्त मालवण तारकर्ली येथे आले असताना त्यांचे जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आले असताना सिंधुदुर्ग भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दरम्यान त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने करण्यात आली होती.
