कलंबिस्त येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुधीर राऊळ यांनी दिली भेट…

⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ- कलंबिस्त इंग्लिश स्कुल येथे चालू असलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनया सुत्य उपक्रमाला मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मळगाव उपशाखाध्यक्ष शतायु जाभळे यांनी भेट दिली. यावेळी राऊळ यांनी शिक्षकांना विद्यार्थ्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ वे शालेय विज्ञान प्रदर्शन जिल्हापरीषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या माध्यमातुन कलंबिस्त इंग्लिश शाळेत भरविण्यात आले होते. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक आणि विद्यार्थानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. वेगवेळ्या विज्ञान प्रयोगाने मुलांनी आणि शिक्षकानी सर्वाची मने जिंकली. या प्रदर्शनास सुधीर राऊळ यांनी भेट दिली. यावेळी राऊळ यांनी सर्वाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, पुढची पिढी अशीच घडवा, पुढच्या पिढीच भविष्य उज्वल आहे आणि पुढच्या पिढीचा हाच पाया आहे तो मजबूत करा, असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page