⚡बांदा ता.०४-: निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथील उद्योगपती दीपक अगरवाल यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गावातील शासकीय निवृत्त अधिकारी गजानन नरसुले यांच्या हस्ते साहित्य देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा निगुडे शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी श्री नरसुले म्हणाले की, मी या शाळेत शिकलो लहानाचा मोठा झालो. शाळेला १०० वर्षे झाली आणि त्या शतक महोत्सव कार्यक्रमात मला सहभागी होता आल हे माझं मी भाग्य समजतो. माझं शरीर जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत मी शाळेला येथील विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर जाधव, उपाध्यक्षा नेहा पोखरे, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे शिक्षक कुसाजी मेस्त्री, रूपाली नेवगी, पांडुरंग होंडे, नारायण नाईक, ग्रामस्थ कृष्णा निगुडकर आदी उपस्थित होते. शिक्षक पांडुरंग होंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
