तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बांदा खेमराज हायस्कुलचे सूर्यकांत चव्हाण यांनी सलग सातव्या वर्षी प्रथम…

⚡बांदा ता.०४-: कलंबिस्त हायस्कूल येथे संपन्न झालेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर गटातून बांदा खेमराज हायस्कुलचे सूर्यकांत चव्हाण यांनी प्रायोगिक खेळणी या गटातून सलग सातव्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

श्री चव्हाण यांची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे सूर्यकांत चव्हाण गेली सात वर्षे विज्ञान प्रदर्शनात सावंतवाडी तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. या वर्षी त्यानी सादर केलेल्या प्रायोगिक खेळण्याच्या मॉडेल मुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना खेळातून सोप्या पद्धतीने प्रयोग दाखवणे शक्य होईल.
  आपल्या यशाबाबत बोलताना श्री चव्हाण यांनी संस्थेचा पाठिंबा, स्वर्गीय आबासाहेब तोरसकर यांचा आशीर्वाद तसेच त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली आहे असे ते म्हणतात. त्यांच्या या यशासाठी धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अध्यक्षा कल्पाना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलींद तोरसकर, बांदा केंद्रप्रमूख संदीप गवस, प्रशालेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्गाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
You cannot copy content of this page