लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काम वाढले पाहिजे…

गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत:महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न

⚡सावंतवाडी ता.३०-: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काम वाढायला पाहिजे. त्यासाठी मी कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आज सावंतवाडीत आल्याची माहिती गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. दरम्यान गोव्यातील खाजगी रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना होईल, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केला. श्री सावंत यांनी आज सावंतवाडी नव्याने उभारण्यात आलेल्या विधानसभा कार्यालयाला भेट देत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी डाॅ.सावंत पुढे बोलताना म्हणाले की, येत्या ४ तारीख ला होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच भाजपला यातील तीन राज्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान गोवा-महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी माझे यापुढे प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page