गोवा मुख्यमंत्री डॉ; प्रमोद सावंत; कुणकेरी भावाई देवीचे घेतले दर्शन..
⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास होण्यासाठी मी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधल असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे दिला.
दरम्यान मी दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येतो त्यामुळे लोकांमध्ये देखील मी गावात आल्याने एक वेगळाच आनंद कुठचा असतो असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले. मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत आज कुणकेरी भावाई मंदिरात दर्शनासाठी आले होते यावेळी ते बोलत होते.
