बांदा शहरासाठी कचरावाहक गाडी उपलब्ध…

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उपलब्ध: साईप्रसाद काणेकर यांचा पाठपुरावा..

बांदा ता.३०-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून बांदा शहरासाठी १२ लाख रुपये किमतीची कचरावाहक गाडी उपलब्ध झाली आहे. या गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची सुविधा आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी पत्रव्यवहार करत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
बांदा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बांदा ग्रामपंचायतकडे कचरा उचलण्याची मर्यादा येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी कचरा गाडी मिळावी अशी मागणी श्री काणेकर यांनी निवेदनाद्वारे मंत्री केसरकर यांच्याकडे जुलै २०२३ मध्ये केली होती. मंत्री केसरकर यांनी तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांना निधी मंजूर करण्यासाठी पत्र दिले. स्थानिक आमदार विकास निधीतून निधी मंजूर करत तात्काळ बांदा शहरासाठी कचरा गाडी उपलब्ध करून दिल्याने श्री काणेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. लवकरच दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे श्री काणेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page