तुळशीराम रावराणे यांची भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती…

सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती जिल्हा प्रभारीपदी शेखर बांदेकर..

⚡बांदा ता.२९-: श्री. तुळशीराम रावराणे यांची भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पतंजली योगसमिती बांदा चे कक्षाप्रमुख श्री. शेखर बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली .

आज दि 28 नोव्हेंबर रोजी दु 12 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती यांची सावंतवाडी नगरपरिषद सभागृहमध्ये जिल्हा स्तरीय सभा संपन्न झाली. या सभेला भारत स्वाभिमान महाराष्ट्र राज्य प्रभारी श्री. बापूजी पडाळकर, पतंजली योगसमिती महाराष्ट्र राज्य प्रभारी श्री. शेखर खापणे, श्री. महेश भाट, श्री . विद्याधर पाटणकर , श्री. रावजी परब , श्री. प्रकाश रेडकर , श्री. सुभाष गोवेकर, श्री. प्रशांत हरमलकर आदि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

   योगाभ्यास करणे आणि योगाचा प्रसार, प्रचार करण्याकरिता  श्री तुळशीराम रावराणे आणि श्री शेखर बांदेकर हे सतत कार्यरत असून  त्यांच्या  कार्याची दखल घेऊन  जिल्हा प्रभारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व योगाभ्यास प्रेमींकडून  त्यांचे अभिनंदन होत आहे.
You cannot copy content of this page