म्हापण जि.प. मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या संवाद व आशिर्वाद दौऱ्यास उत्स्फुर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ले ता.२९-: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच तळागाळातील जनतेशी थेट संपर्क साधून तेथील प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘संवाद दौरा २०२३ अंतर्गत पश्नाचे नेते तथा खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी साधलेल्या संवाद दौऱ्यात जेष्ठ शिवसैनिक, युवा सैनिक व महिला कार्यकत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत म्हापण जिल्हा परीषद मतदार संघात दौरा केला.

या दौऱ्यात जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसादांत शिवसेनेला आशिर्वाद दिले.
वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी म्हापण जिल्हा परीषद भागात केलेल्या दौऱ्यात कुशेवाडा, परुळे बाजार, म्हापण, निवती या गावातील पुरुष, महिला कार्यकर्ते, युवा सैनिक यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व जेष्ठ शिवसैनिकांकडून त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतले. या संवाद दौऱ्यात सेनेच्या कार्यकर्त्या बरोबरच जनतेकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लागला. यावेळी वेंगुर्ले तालुका संपर्कप्रमुख बाळा चिपकर, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, महिला तालुका संघटिका सौ. सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ आणि वेंगुर्ले तालुक्यातील महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page