इनोवा गाडीच्या धडकेत पादचारी ठार…

माडखोल येथील घटना; कारचालका विरोधात गुन्हा दाखल..

⚡सावंतवाडी ता.२९-: इनोवा क्रिस्टा गाडीने ठोकर दिल्याने पादचारी बाबुराव राऊत वय( 65) बुधवारी ठार झाल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास माडखोल धवडकी येथे घडली याप्रकरणी इनोवा चालक दीनानाथ राजाराम बल्लाळ रा.दाणोली याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे अधिक माहिती अशी की आंबोली वरून बल्लाळ सावंतवाडीच्या दिशेने इनोवा क्रिस्टा गाडी घेऊन येत असताना माडकोल धवडकी येते सकाळी नऊच्या सुमारास क्लीनर साईडचा गाडीचा आरसा लागल्याने पादचारी रस्त्यावर पडले ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांच निधन झाल. या बाबातची मृताचा मुलगा उदय राऊत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली.

You cannot copy content of this page