⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हाधिकार्यांनी काढलेले जमावबंदीचे आदेश झुगारुन आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या १६ जणांना आज येथील न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
याबाबतची अधिक माहिती आशी की सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर दि.26 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे “पाकिस्तान झिंदाबाद” चे नारे देणाऱ्या पीएफआय संघटनेच्या “त्या” युवकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश झुगारून निदर्शने केली होती. या प्रकरणी मनसेचे प्रसाद गावडे, आशिष सुभेदार,राजू कासकर,मंदार नाईक,आबा चिपकर, सुरेंद्र कोठावळे विष्णू वसकर कौस्तुभ नाईक मनोज कांबळी, यांसहित आदी 16 कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम 143,149,188 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 अन्वये दाखल गुन्हे प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,सावंतवाडी न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.
