वीज कनेक्शन तोडल्याने फुल विक्रेते आक्रमक…

नगरपालिकेला घातला घेराव;वीज वितरण च्या अधिकाऱ्यांशी बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्यास सांगतो;मुख्याधिकारी सागर साळुंखे..

⚡सावंतवाडी ता.२९-: दिवसाला शंभर रुपये कर भरूनही नगरपालिका प्रशासनाने विज बिल भरणा न केल्याने शहरातील फुल विक्रेत्यांच्या स्टॉलचे वीज कनेक्शन आज विज वितरण कडून कापण्यात आले. या प्रकाराने संतप्त झालेल्या फुल विक्रेत्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना घेराव घातला.

विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सावंतवाडीत भाजी मंडईत व्यवसाय करत असतांना आम्ही दिवसाला पन्नास रुपये कर भरणा करत होतो. मात्र आता उभारण्यात येणाऱ्या नव्या भाजी मंडईच्या काॅम्प्लेक्सच्या पार्श्वभूमीवर आम्हाला अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. कुठलाही विरोध न करता आम्ही दिलेल्या जागेस स्थलांतरित झालो शिवाय असे असतानाही स्व खर्चातून त्या ठिकाणी स्टॉल उभारले. मात्र असे असताना 17 हजार रुपयाचं विज बिल पालिका प्रशासनाकडून भरण्यात आले नाही. दिवसाला शंभर रुपयाप्रमाणे एकूण 18 स्टॉल धारकांचे महिन्याला 54 हजार रुपये स्वरूपात पालिकेकडे जमा असताना विज बिल भरणा न करणे चुकीचे आहे आज दिलेल्या जागेत पाण्याची शौचालयाची कुठलीही सोय नसताना आम्ही व्यवसाय करत आहोत. मात्र पालिका प्रशासनाला विज बिल भरणा करण्यासाठी कर स्वरूपात अजूनही ज्यादा रक्कम पाहिजे आहे मात्र आमचा याला विरोध आहे असे ज्येष्ठ फुल विक्रेते विजय राणे यांनी सांगितले

. तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिली जात आहे गेली कित्येक वर्ष सावंतवाडी शहरात व्यवसाय करत आहोत परंतु अशा प्रकारची वागणूक आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही मात्र अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर ती चुकीची असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मुख्याधिकारी श्री साळुंखे यांनी सद्यस्थितीत आपण स्वतः वीज वितरण च्या अधिकाऱ्यांशी बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्यास सांगतो. तसेच अन्य काही गैरसमज गोष्टी असतील तर त्यावर मार्ग काढण्यासाठी विज बिल संदर्भात फुल विक्रेत्यांची वेगळी बैठक घेऊन निर्णय घेऊ असे स्पष्ठ केले. यावेळी सुधाकर राणे, लवू तावडे, बंड्या परब, रामदास कावले, जॉनी डिसोजा, पावलो डिसोजा, मार्सेलिन आल्मेडा, चंद्रकांत पिकुळकर,प्रवीण म्हस्कर, बाबू सुभेदार,बंड्या परब, रॉजर आल्मेडा,नासिर शहा,जमीर सारंग,अन्वर शहा आदी फुल विक्रेते उपस्थित होते.

You cannot copy content of this page