आदित्य ठाकरे: हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरत असून फक्त घाणेरड राजकारण करायला पाहिजे..
⚡सावंतवाडी ता.२३-: येणारा विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात चित्र नक्कीच बदलणार परंतु राज्यात देखील लोकसभा आणि विधानसभेत परिवर्तन होणार असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.दरम्यान खळा बैठकावर टीका करणाऱ्यांना जाऊ दे असे आदित्य ठाकरे यांनी नितेश राणे यांचे नाव घेता पत्रकारानी विचारलेले प्रश्नाला उत्तर दिले.
यावेळी आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की निवडणुका लढा जिंका आणि सरकार बनवा पण घटनाबाह्य व संविधानाच्या विरोधात जाऊन सरकार जप्त व काबीज करणे म्हणजे अतिक्रमण होय त्यामुळे राज्यातील आत्ताचे सरकार बाद होणे गरजेचे आहे या सरकारने महाराष्ट्रात जे काही केले ते म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचे मत युवासेना प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.
तर राज्यात घाबरट सरकार राज्यकर्ते म्हणून काम करत आहेत निवडणुका घेण्याचे ते टाळत असले तरी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच विजय प्राप्त करेल व राज्यात पुन्हा एकदा बदल दिसेल असा विश्वासही श्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
