चंद्रकांत जाधव: 130 ठिकाणी होणार साजरा..
सावंतवाडी: भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती मोर्चा तर्फे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ स्तरावर संविधान गौरव दिन 130 ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव यांनी सावंतवाडी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भाजपने आजपर्यंत संविधान जपण्याचे काम केले आहे. परंतु ,महाविकास आघाडीचे नेते संविधानाचा फायदा उचलत जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तसेच भाजप संविधान बदलणार अशा खोट्या अफवा विरोधी पक्षातील लोक करतायत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांमध्ये तेढ निर्माण करणे बंद करावे. सत्तर वर्षात जनतेला संविधानाची माहितीच नव्हती. परंतु, भाजपने गेल्या नऊ वर्षात लोकांना संविधानाची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली असे प्रतिपादन अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव यांनी केले. यावेळी अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला जिल्हाध्यक्षा सोनिया मठकर, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव जाधव, जिल्हा चिटणीस किशोर जाधव, परिक्षीत मांजरेकर, प्रकाश कदम, प्रांजल जाधव, प्रशांत जाधव, पुंडलिक जाधव आदी उपस्थित होते.
