Headlines

फळ पीक विम्याची रक्कम २८ नोव्हेंबर पर्यंत जमा करा…

अन्यथा मोर्चा:उबाठा शिवसेनेच्या रुपेश राऊळ यांचा इशारा..

सावंतवाडी ता.-: सावंतवाडी तालुक्यातील अनेक शेतकरी फळ विमा योजने पासून वंचित असून अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाय त्यामुळे येथा 28 नोव्हेंबर पर्यंत ही रक्कम जमा करा अन्यथा 29 नोव्हेंबर रोजी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती ही गंभीर असून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये याची दखल घेऊन आपण ही रक्कम जमा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी सागर राऊळ, विनीत राऊळ, बालकृष्णन राऊळ, यशवंत राऊळ, सुनिल राऊळ, अनंत शिरखे, रविंद्र परब, अमोल राऊळ, प्रभाकर गावडे, सुरेश शिरखे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page