१३० कोटींचे रस्ते जनतेसाठी कि ठेकेदारांकडून मलिदा खाण्यासाठी ? – मनसेचा सवाल
*💫मालवण दि.१२-:* १३० कोटी कुडाळ मालवण मतदार संघात आले,विकासकामांसाठी निधी मंजुर झाला अशा प्रकारच्या अनेक घोषणा आता पर्यंत आमदार वैभव नाईक यांनी केल्या. मग अजुनही त्यांच्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील रस्ते खड्डेमय का?घोषणा केलेले १३० कोटींचे रस्ते जनतेसाठी कि ठेकेदारांकडून मलिदा खाण्यासाठी ? असा सवाल मनविसे माजी जिल्हाअध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी मतदार संघासाठी १३० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाल्याची घोषणा नुकतीच केली. त्यावर प्रतिक्रिया देताना इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की,मंजुर झालेला निधी ठेकेदारांसाठी की जनतेसाठी ?जनतेला सुरळीत रस्त्यावरुन प्रवास करण्यासाठी की ठेकेदारांकडुन मलिदा खाण्यासाठी ? यापुर्वीही आमदारांनी कोटींच्या रस्त्यांच्या निधीची घोषणा केली.यानंतर आतापर्यंत झालेले रस्ते हे खड्डेमय झाले आहेत.जनता समाधानी नाही. सध्या चौके-कुडाळ रस्त्यावर चाललेले काम अनेक महिने सुरु आहे..परंतु या नविन केलेल्या रस्त्यावरही(बीबीएम) दोन-तीन ठिकाणी आत्ताच खड्डे पडले आहेत.पावसाळा अजुन बाकी आहे.म्हणजेच रस्त्यांची कामे झाल्यावर लगेच खड्डे पडतात.याकडे आपण दुर्लक्ष करता.चौके-कुडाळ खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करणारे मला नेहमी ‘शुभेच्छा’ देतात असे आमदारांनी मालवणातील जाहीर कार्यक्रमात कबुल केले होते.फक्त निधी आणता ठराविक ठेकेदारांना संगनमताने कामे देता.या ठेकेदारांकडुन रस्त्यांची दर्जेदार कामे होत नाहीत.त्यामुळे आमदारांनी चालवलेली जनतेची दिशाभुल वेळीच थांबवावी अन्यथा मनसे सातत्याने पोलखोल करणार. देवबाग येथील जिओ ट्युबच्या निकृष्ट कामाविरोधात मनसेने आंदोलन केले होते.त्यावेळीही आमदारांनी उद्घाटन करत ठेकेदारांकडुन दक्षिणा घेतली होती.ठेकेदारास पाठीशी घातले.नंतर मात्र हेच आमदार स्थानिक जनतेने आक्षेप घेतल्यानंतर दोन वर्षांनी सदरील देवबागच्या जिओट्युबच्या निकृष्ट कामाबाबत पत्तन विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार करतात. ‘गिरे तो भी टांग उपर’ ही आमदारांची कार्यपद्धती आता जनतेला माहीत झाली आहे. इब्रामपूरकर यांनी मच्छीमारांच्या पॕकेजबाबत आमदार वैभव नाईकांवर टिकास्र सोडले आहे, मच्छीमारांचे पॅकेज मच्छीमारांना वेळेवर देणार आहात का? की शेतकऱ्यांसारखी मच्छीमारांची फसवणूक करणार आहात? यापुर्वीही आपण अनेकवेळा मच्छीमारांकडुन सत्कार करुन घेतले.मग प्रत्यक्षात त्यांच्या पदरी पैसे केव्हा येणार?सर्वच मच्छीमारांना मस्यपॕकेजचा लाभ मिळणार का? म्हणुनच राज्य सरकारची फसवी घोषणा आणि आपलीही फसवी घोषणा असुन कालांतराने मनसे अशा फसव्या घोषणांची पोलखोल करणार असल्याचे इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.
