मालवणात १४ रोजी बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग कार्यक्रम…

*💫मालवण दि.१२-:* एकता मित्रमंडळ मालवण आणि रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १४मार्च रोजी सकाळी १० वाजता बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग Basic Life Support Training (जीवन संजीवनी) हा कार्यक्रम अमेय आनंद देसाई, मालवण यांच्या निवस्थानी आयोजित करण्यात आला आहे. हे ट्रेनिंग कुडाळ येथील गव्हर्नमेंट स्विमिंग कोच प्रवीण सलोकार हे देणार आहेत. आपल्या घरात किंवा इतर ठिकाणी एखादी व्यक्ती अचानक अत्यव्यस्थ झाल्यास त्याच्यावर करता येणार सर्व प्रथमोपचार या ट्रेनिंग मध्ये दिले जातात तसेच या शिबिरामध्ये ट्रेनिंग घेतलेल्या व्यक्तीमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. प्रत्येक तरुण तरुणी तसेच गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी हे ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. तरी आजकालच्या परिस्थितीत अतिउपयुक्त आशा या ट्रेनिंगचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकता मित्र मंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page