कातकरी बांधवांच्या मुलभुत समस्या सोडविण्यासाठी तातडीची बैठक बोलवावी ;…

अन्यथा आंदोलन अटळ;दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी_

*💫कणकवली -:* फोंडाघाट येथील कातकरी वस्तीवर वीज जोडणी आणि पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.अन्यथा कोव्हीड काळात या आदिवासी कातकरी बांधवांचे जगणे मुश्किल होईल. कातकरी वस्तीचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक ऍड.सुदीप कांबळे आणि अंकुश कदम यांनी केली आहे. फोंडाघाट येथील कातकरी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांसाठी दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने 12 मार्च रोजी प्रांत कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा जमावबंदी आदेशामुळे स्थगित केला आहे. मात्र कातकरी बांधवांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कणकवली प्रांताधिकाऱ्यांनी कातकरी बांधव प्रतिनिधी, दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठकी घ्यावी. या बैठकीत कातकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

You cannot copy content of this page