*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती*
सावंतवाडी-: माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भाजपच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येणार आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सावंतवाडी शहरात नगराध्यक्ष संजू परब यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व बेडशीट वाटप करण्यात येणार आहे. तसेच अनाथाश्रमात व गोरगरीब जनतेला धान्य देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे
