पुणेरी पहाट “हा गीत संगीत व नृत्य संवादाचा कार्यक्रमाला देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.१६-: दीपावली सणाचे औचित्य साधून “पुणेरी पहाट “हा गीत संगीत व नृत्य संवादाचा देवगड मधील कलाकारांचा कार्यक्रम गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ६ वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी संगीत रसिकांच्या उपस्थितीत पार पडला.

हा कार्यक्रम लेखन दिग्दर्शक डॉ. भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून .या कार्यक्रमाचे संयोजन चारुदत्त सोमण नियोजन व निवेदन संजय धुरी यांनी केले.


. दिवाळी म्हटले की घरांची सजावट बहुतांशी विद्युत रोषणाई, दिव्यांची आरास ,फराळाची मेजवानी, आणि फटाक्यांची आतशबाजी यात लहान थोर सारेच मजा लुटत असंतात, याच काळात थंडीला सुरुवात होत असते म्हणूनच सकाळचा आनंद सारेजण संगीताने घेतात आणि म्हणूनच ही सकाळची संगीत मेजवानी पुणेरी पहाट या रूपाने ! देवगड वासीयांनी अनुभवली. देवगडचे नामवंत कलाकारांच्या विशेष सहभाग असलेला हा संगीतमय कार्यक्रम ,देवगड मध्ये विविध पैलूचे कलाकार आहेत त्यांना पारखून गायन वादनाची संधी देणे हाच मूळ उद्देश या कार्यक्रमाचा होता. विविध गाण्यांची सुसूत्रता साधत नृत्य संवाद व निवेदनाचा मेळ घालून कार्यक्रमाची बांधणी यात केली होती. सुरुवातीलाच नारद या कार्यक्रमाची उकल करतो. दिवाळी पहाट मध्ये भक्ती गीत व नाट्यगीतांचा संथपणे तरुणाई पासून जेष्ठ नागरिक अशा सर्व वर्गाला आवडेल अशा प्रकारच्या गाण्यांचा समावेश यात केला होता. गीत संगीत नृत्य निवेदन नेपथ्य आकर्षक आवश्यक लाईट व्यवस्था ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये हा कार्यक्रमात भावगीत भक्तीगीत,नाट्यगीताबरोबर,
गवळणं लावणी शेतकरी गीत,जोगवा गीत,बहारदार बासरी वादन सादर करण्यात आले.प्रामुख्याने गायक संदीप फडके, राकेश मिठबावकर, गायिका डॉ. निशा धुरी, सौ प्रियांका वेलणकर डॉ. पूजा पाटील, बासरी वादक राधिका कुलकर्णी ,वादक सिंथेसायझर गंधार कदम, तबला ढोलकी रमेश गोंधळी ,ऑक्टोपड नरेंद्र पाटील हार्मोनियम संदीप साऊंड लाईट विजय सडेकर नेपथ्य सागर इव्हेंट स्पेशल एफर्ट्स नारद आकाश सकपाळ कथ्थक श्रुती सोमण , लावणी नृत्त्य कीर्ती पुजारे,यांचा सहभाग होता.

You cannot copy content of this page