⚡मालवण ता.१५-: मालवण देऊळवाडा येथील मूळ रहिवासी भिवसेन आत्माराम सोनवडेकर (वय ७५) यांचे दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
कोल्हापूर शिंगणापूर येथे वास्तव्यास असलेले भिवसेन सोनवडेकर यांनी मुंबई मध्ये काही काळ हात रुमाल बनविण्याचा व्यवसाय केला होता. तर प्रिंटिंग व्यवसायातही त्यांनी काम केले होते. उत्तम आचारी असणाऱ्या भिवसेन सोनवडेकर यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, सून, मुलगी, पुतणे, पुतणी, नातू असा परिवार आहे. मालवण देऊळवाडा येथील गौरव सोनवडेकर यांचे ते काका होत
