ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळच्या तिरंगी बारीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ, प्रतिनिधी

ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळ यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त तिरंगी बारीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या बारीच्या सामन्यात बुवा अरुण घाडी, युवा समीर कदम आणि बुवा दिनेश वागदेकर यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.
ओमसाई मच्छीमार्केट, मित्रमंडळ कुडाळचे अध्यक्ष कान्हा उर्फ कृष्णा केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बारीचा जंगी सामना रंगला.
ओमसाई मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य शेखर तवटे यांच्या हस्ते तिरंगी बारीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका आफरीन करोल, नगरसेविका नयना मांजरेकर, राजेश म्हाडेश्वर, निवेदक नागेश नेमळेकर, मंडळाचे सदस्य अरविंद करलकर, बाबू आसोलकर, कृष्णा तेली, संजय बोभाटे, बंटी पावसकर, विपुल करलकर, भूषण परब, शिवाजी देवर, पप्पू शिरसाट, सचिन गडेकर, दत्तू घाडी, राकेश केसरकर, हुजेफा खुल्ली, सागर माळकर, सिद्धेश वर्दम, गोट्या कोरगावकर, वैभव कदम आदींची मुख्य उपस्थित होती. यावेळी मंडळातर्फे कुडाळ नगरपंचायतचे सफाई कर्मचारी गौतम कदम आणि संतोष नेरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मागील २४ वर्ष मंडळाचे अध्यक्ष कान्हा केसरकर आणि इतर सर्व मंडळाचे पदाधिकारी मच्छीमार्केटमध्ये लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून डबलबारी, दशावतार नाटके असे विविध स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.

You cannot copy content of this page