⚡मालवण ता.१५-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील रहिवासी मंदार रघुनाथ पटवर्धन (वय ३५) यांचे आज सकाळी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
कांदळगाव येथील मंदार पटवर्धन हे पुरोहित म्हणून काम करायचे त्यांनी
काही काळ पत्रकारितेतही काम केले होते. मुंबईसह जिल्ह्यात धार्मिक कार्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असायचा. मनमिळावू आणि हसतमुख स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार दांडगा होता. गेले काही दिवस ते आजारी होते. आज कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण, भावोजी असा परिवार आहे. कांदळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कांदळगाववासीयांतर्फे श्रद्धांजली
यावेळी कांदळगाव ग्रामस्थांच्या वतीने पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना उमेश कोदे म्हणाले, गावच्या धार्मिक तसेच सामाजिक कार्यात मंदार पटवर्धन यांचा सहभाग असायचा लहान वयात त्यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक माणसे जोडली होती मंदार हे त्यांच्या कुटूंबाचा प्रमुख आधार होते त्यांच्या निधनामुळे आपण सर्वजण एका चांगल्या व्यक्तीला मुकलो आहोत असे सांगितले
