⚡मालवण ता.१५-: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिरचा १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन सोहळा १७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.
यानिमित्त मंदिरात आंगणे कुटुंबियांमार्फत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ रोजी सकाळी ९ वा. ब्राह्मणाच्या हस्ते पूजा- अर्चा व अभिषेक, दुपारी १२ वा. सुवर्ण कलश, • ध्वज पूजा, दुपारी १२.३० वा. आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांचे भजन, रात्री १० वा. समुद्र मंथन, मुंबई निर्मित विनोदी नाटक ‘वाकडी तिकडी’ सादर होणार आहे. या नाटकात टीव्ही स्टार अंशुमन विचारेसह इतर कलाकार भूमिका साकारत आहेत. १८ रोजी रात्री १० वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा रात्री ९ वाजता सुरू होईल. स्पर्धकांनी बाबू आंगणे (७५८८४०९५८९) दिनेश आंगणे, प्रसाद आंगणे यांच्याशी संपर्क साधावा. उपस्थित राहण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांतर्फे करण्यात आले आहे.
