राजू मसुरकर: सावंतवाडीकरांना केले आवाहन…
⚡सावंतवाडी ता.१५-: येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळच्या वेळी दिवाळीनिमित्त करण्यात येणारी आतिषबाजी न करण्याचे आवाहन जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी युवक व सावंतवाडीच्या नागरिकांना केले आहे.
दरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक पेशंट येत असतात तसेच काही रूग्ण ऍडमिट देखील असतात त्यामुळे त्यांना याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे नागरिकांनी व युवकांनी याची दक्षता घेऊन त्या ठिकाणी फटाके न लावता केशवसुत कट्टा येथे वाजवून आनंद घ्यावा यावे असे आवाहन देखील श्री मसूरकर यांनी यावेळी केले आहे.
