महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कडुन आगीत बेचिराख झालेल्या मच्छिमारांना मदत

⚡वेंगुर्ले ता.१५-: नरकचतुर्थी च्या पहाटेला शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण उर्फ गोटया परब यांच्या मच्छी व्यवसायाच्या ठेवलेल्या शेड मधील जाळया,होडी व इतर साहित्य याला आकस्मित आग लागून लाखोचे नुकसान झाले होते या संदर्भात भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब,प्रथमेश तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थिती ची माहिती घेऊन त्यांना भाजप युवा मोर्चा कडून आर्थिक मदत केली.

यावेळी त्यांच्या सोबत शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर,शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे,शिरोडा ग्रामपंचायत विदयमान सदस्य सुधीर नार्वेकर,मयूरेश शिरोडकर भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,विदयमान आरवली सरपंच समीर कांबळी, शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य तातोबा चोपडेकर,शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार ग्रामस्थ प्रशांत बटा,सत्यविजय पेडणेकर,सदाशिव तारी,सुहास निकम,सावळाराम बटा,संदेश सावंत,देविदास कुबल,वासू तारी,प्रमोद मोठे,गोपाळ बटा,तृप्तेश चोडणकर,भाई घाटवळ, आणी इतर ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page