⚡वेंगुर्ला ता०८-: रंगभूमी दिनाचे औचित्य साधून 5 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथील कलावलय या संस्थेने येथील साई डिलक्स हॉल येथे नटराजाचे पूजन करून रंगभूमी दिन साजरा केला. यावेळी कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव सुनिल रेडकर, सदस्य चतुर पार्सेकर, प्रविण सातार्डेकर, दादा सोकटे, बापू वेंगुर्लेकर, अमेय तेंडोलकर, राजाध्यक्ष आदी उपस्थित होते. बाळू खांबकर यांनी रंगभूमी दिनाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
कलावलय तर्फे रंगभूमी दिन साजरा…
