सावंतवाडी मराठा समाजाच्या बाईक रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद…

जोरदार घोषणाबाजी:तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर..

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला भगव्या टोप्या हातात भगवा झेंडा घेऊन जय शिवाजी जय भवानी अशा जय घोषात एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देत शहरातून हि रॅली तहसीलदार कार्यालयात पोहचली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

दरम्यान सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे श्री देव पाटेकर यांच्या चरणी नारळ अर्पण करून सकल मराठा समाजाच्या बाईक रॅलीला सुरुवात झाली. राजवाडा येथे या रॅलीत सहभागी झालेले सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले.

यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे- परब, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, पूजा दळवी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, उबाठा सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, महिला आघाडीच्या अपर्णा कोठावळे, मनसेचे सुधीर राऊळ, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजू तावडे अशा मराठा समाजातील सर्व पक्षातील नेत्यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला.

बाईक रॅलीने वेधले लक्ष


सावंतवाडी शहरात दाखल झालेले सावंतवाडी तालुक्यातील मराठा बांधव आपापल्या मोटरसायकली घेऊन त्यावर भगवा ध्वज लावून ‘जय भवानी, जय शिवाजी.!’, ‘एक मराठा, लाख मराठा.!” अशा घोषणा देत होते. सावंतवाडीचा मोती तलाव परिसर आणि त्यानंतर थेट सावंतवाडी तहसीलदार कार्यालय या परिसरात मराठा बांधव दाखल झाले. आपल्या मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना आपले निवेदन सादर केले. या बाईक रॅलीने उपस्थितांचे लक्ष तर वेधलेच शिवाय शासनाचे देखील लक्ष वेधले आहे. अत्यंत शांत, संयमी व शिस्तबद्धपणे ही रॅली पार पडली. त्याबद्दल सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांनी सर्वांचे आभार मानले व हीच एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही केले.

रात्रभर पाऊस तरीही मराठा समाज बांधवांचा उत्साह कमालीचा –

दरम्यान, काल रात्री झालेल्या पावसामुळे आज सकाळी झालेल्या आयोजित केलेल्या रॅलीत मराठा समाज बांधव कशा प्रमाणात सहभागी होतील?, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र सह्याद्रीच्या दर्‍या – खोऱ्यातून आपल्या मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मराठ्यांची आरक्षणाची मागणी जोरदारपणे लावून धरण्यासाठी आणि विशेषतः प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तमाम मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सावंतवाडीत आपल्या मोटर सायकली घेऊन दाखल झाले. सळसळत्या पावसाच्या सरींसह मराठ्यांची जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण सावंतवाडी शहर न्हावून निघाले होते.

महिलांचाही सहभाग कमालीचा –

दरम्यान या रॅलीत सहभागी झालेल्या आणि सावंतवाडी तालुक्यातील वाडीवस्तीतून आलेल्या मराठा समाजातील महिला भगिनी यांचे सुद्धा प्रमाण चांगले होते आणि त्यांनी कमालीचा उत्साह दाखवत मराठा समाजाची एकजूट आणि त्यासाठी महिला रणरागिणींचा असलेला उत्साह हा निश्चितच अचंबित करणा

You cannot copy content of this page