कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळ नामफलकाचे अनावरण…

⚡कणकवली ता.०६-: नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, ( अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली) येथील व्यापारी मित्र मंडळाने मुंबई गोवा हायवे लगतच नवीन नामफलकाचे अनावरण केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर व राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत नामफलक अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी अशोक करंबेळकर यांनी वडापाव सेंटरचा शुभारंभ केलेल्या सर्फराज शेख आणि अलिकडेच ई सेवा केंद्र चालू केलेल्या श्री. कदम यांना पुष्पगुच्छ देवुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच समस्त व्यापारी मित्र मंडळाला सर्वांनी एकत्र येऊन, स्थानिक आमदार व प्रशासनाला आपण नवीन मार्केट बांधण्यासाठी आग्रही मागणी करुया व लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विनंती करुया असे आवाहन करण्यात आले.यावेळी सर्व व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य व्यापारी मित्र उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page