लहान मुलांच्या आकाश कंदील स्पर्धेत 100 मुलांचा सहभाग…

बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे लहान मुलांसाठी आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल १०० मुलांनी भाग घेत स्पर्धा यशस्वी केली. यावेळी एकूण १० विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम – सिमरन सागर बांदेकर, द्वितीय- प्राची प्रसाद यादव, तृतीय- शुभ्रा सागर तेली, चतुर्थ – तनिष्का संदीप देसाई, पाचवा – हर्षल श्यामसुंदर वरग. तसेच शिवम राजन कदम, नाजुका आरिफ खान, साईश सागर बांदेकर, आर्या पिराजी शिंगाडे, आर्या दत्ताराम चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, शिवम गावडे, विनिता कुबडे, ईश्वरी कल्याणकर, शाळेचे शिक्षक जे. डी. पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते.
रोटरॅक्टचे अध्यक्ष अक्षय मयेकर म्हणाले की, आजकाल बाजारात प्लास्टिक आकाशकंदील सहज उपलब्ध होत असल्याने मुलांना पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. आभार जे. डी. पाटील यांनी मानले.
फोटो :-
बांदा केंद्रशाळेत आयोजित आकाशकंदील स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page