जेरॉन फर्नांडिस यांनी मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी केला पराभव..
⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या आचरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय मिळविला या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जेरोन फर्नांडिस यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आणि माजी सरपंच मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी पराभव केला. हा पराभव करतानाच भाजपने ग्रामपंचायतीच्या १३ पैकी ११ जागांवर विजय संपादन केल्याने शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने या विजयाचे श्रेय माजी खासदार निलेश राणे आणि भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांना देतानाच हा विजय आचरे वासियांचा असल्याचेही म्हटले आहे.
मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची बनली होती. याठिकाणी भाजपने जेरोन फर्नांडीस तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी सरपंच मंगेश टेमकर यांना सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवले होते. भाजपच्या प्रचारासाठी दत्ता सामंत दहा ते बारा दिवस येथे तळ ठोकून होते. तर शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार वैभव नाईक स्वतः तळ ठोकून होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. काल याठिकाणी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आल्यानंतर आज मालवण तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली.
आचरे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने निर्विवाद विजय मिळवला आहे. भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस यांनी १४३५ तर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच उमेदवार मंगेश टेमकर यांनी ११९३ मते मिळवली. तर जगदीश पांगे यांना ७० मते मिळाली. जेरॉन फर्नांडिस हे २४२ मतांनी विजयी झाले. यामध्ये नोटा ३४ आहेत
आचरा प्रभाग एक:
प्रभाग एक: सर्वसाधारण – उमेदवार मुजफ्फर मुजावर (३७६ विजयी), चंद्रशेखर मुणगेकर (२८९), नोटा (१५). ना मा प्र महिला- उमेदवार सारिका तांडेल (३३८ विजयी), प्रिया मेस्त्री (३००), नोटा (४२) सर्वसाधारण महिला – पूर्वा तारी (३०० विजयी), प्रियता वायंगणकर (२७३) गौरी सारंग (८८), नोटा (१९)
प्रभाग दोन- सर्वसाधारण उमेदवार -योगेश गावकर (३०८ विजयी), जगदीश पांगे (१९८), सचिन बागवे (२०२), नोटा (१३) , सर्वसाधारण महिला उमेदवार अनुष्का गावकर (३२९ विजयी), शाहिन काझी (९७), प्राजक्ता देसाई (३१२), सुकन्या वाडेकर (२७८), सायली सारंग (३२१ विजयी), नोटा (२५)
प्रभाग तीन सर्वसाधारण उमेदवार
चंद्रकांत कदम (१५७ विजयी), अनिकेत मांजरेकर (१०४), नोटा (२)
ना मा प्र महिला श्रद्धा सक्रु (९३) श्रुती सावंत (१६८ विजयी), नोटा (२)
प्रभाग चार सर्वसाधारण महेंद्र घाडी (२६१ विजयी), सदानंद घाडी (१३१), नोटा (६) सर्वसाधारण महिला उमेदवार हर्षदा पुजारे (२७५ विजयी), युगंधरा मोर्जे (११४), नोटा (९)
प्रभाग पाच ना मा प्र उमेदवार पंकज – आचरेकर (३८४ विजयी), चंदन पांगे (३०७), नोटा (१९) सर्वसाधारण संतोष मिराशी ( ३९९ विजयी), माणिक राणे (२९६), नोटा (१५). सर्वसाधारण महिला किशोरी आचरेकर ( ३९३ विजयी), अमृता गावकर (२९७), नोटा (२०)
ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. ” निलेश राणे आगे बढों” अशा घोषणा देत दत्ता सामंत यांनी या विजयाचे श्रेय भाजपा नेते निलेश राणे यांना दिले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, राजन गावकर, संतोष कोदे, नीलिमा सावंत, सुनील घाडीगांवकर, संदीप परब, संतोष गावकर, राजू परुळेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ज्ञानदेव पाटील, विजय केनवडेकर, भाई मांजरेकर, राजू प्रभुदेसाई, दयानंद देसाई, ललित चव्हाण, महेश सारंग, प्रकाश तोंडवळकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
