पर्ससीन नौका हल्लाप्रकरणी सातजणांना न्यायालयीन कोठडी…

⚡मालवण ता.०६-: तळाशील येथील समुद्रात पर्ससीन व पारंपारिक मच्छिमारांमध्ये झालेल्या संघर्षप्रकरणी अटक होऊन पोलीस कोठडीत असलेल्या तळाशील येथील सात मच्छीमारांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सातही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आठवडाभरापूर्वी तळाशील येथील समुद्रात मासेमारी करणाऱ्या सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांच्या ‘चिन्मय प्रसाद’ या पर्ससीननेट नौकेत घुसून नेपाळी खलाशांवर हल्ला केल्याप्रकरणी कृष्णा मेघश्याम कांदळगावकर (२७, रा. तळाशील), अक्षय सुभाष पवार (२९, रा. तोंडवळी), प्रथमेश विष्णू शेलटकर (३२, रा. तळाशील), सुहास सुधीर चेंदवणकर (रा. तोंडवळी), रामजी चंद्रकांत बागवे (४९, रा. तोंडवळी), करण मेघश्याम कांदळगावकर (२९, रा. तळाशील), प्रणय विष्णू शैलटकर (रा. तळाशील ) या सात संशयितांना पोलिसांनी अटक केली. या सात जणांना यापूर्वी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

You cannot copy content of this page