भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा दावा तर घाडीगांवकर यांचा त्याला दुजोरा..
⚡मालवण ता.०६-: चाफेखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीत विजयी झालेल्या रविना घाडीगावकर या भाजपच्याच असल्याचा दावा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला असून श्री. चिंदरकर यांनी केलेल्या या दाव्याला चाफेखोल गावच्या नवनिर्वाचित सरपंच दस्तूरखुद रविना घाडीगावकर यांनी मालवणच्या भाजप कार्यालयात उपस्थिती दर्शवीत दुजोरा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे
भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला . पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, आचरा आणि चाफेखोल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे कार्यकर्त्यांची एकजूट आणि मेहनतीचे फळ आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध आहे असे सांगून ते म्हणाले, आचरा आणि चाफेखोल अशा दोन ग्रामपंचायतीचा निकाल आज होता या दोन्ही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने विजय मिळविला. तसेच यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली त्याचप्रमाणे मालवण कुडाळ मतदार संघाची धुरा सांभाळणारे भाजपचे नेते निलेश राणे यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. आचरा ग्रामपंचायत ही सर्व कार्यकर्ते एकजूट होऊन लढले. आचरा व चाफेखोल या गावातील लोकांचा तेथील कामांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यासाठी निलेश राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून विकासात्मक कामे प्राधान्याने कशी पूर्ण करता येतील याकडे लक्ष दिले जाईल असे ते म्हणाले
ते पुढे म्हणाले, चाफेखोल ग्रामपंचायत निवडणूकित सरपंच पदाचे उमेदवार रविना घाडीगांवकर या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असल्याचे काल शिवसेनेच्या ( शिंदे गट) बबन शिंदे यांनी म्हटले होते आणि त्यात भाजपचा संबंध नाही असा दावा केला होता मात्र रविना घाडीगांवकर या दोन वेळा भाजप मधून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या असून आजही त्या विजयी झाल्यानंतर आमच्या बरोबर आहेत आगामी काळात भाजप शिवसेना शिंदे गटाला एकत्र काम करायचे आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानी अशा गोष्टी करू नयेत एकत्र बसून काही निर्णय घेऊ शकतो. शिंदे गटातील काही लोकांनी जर भाजपा शिवसेना युती मानत असतील तर त्यांनी परत असे कृत्य करू नये भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल असे चिंदरकर यांनी स्पष्ट केले
दरम्यान, माजी जि प अध्यक्ष अशोक सावन्त यांनी मागील काही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आले आणि या पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील त्याचप्रमाणे या निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम केले त्यांचे अभिनंदन करतो असे यावेळी श्री सावंत यांनी सांगितले.
