एक लाख ८० हजाराचे नुकसान:चिवला बीच येथील घटना
मालवण दि प्रतिनिधी :
मालवण चिवला बीच चौकचार मंदिर पासून काही अंतरावर किनाऱ्यावर उभी करून ठेवलेल्या आल्बट कामील फर्नांडिस यांच्या मालकीच्या गिलनेट मासेमारी नौकेला रविवारी मध्यरात्री कोणी अज्ञाताने आग लावल्याने नौकेतील जाळी, मच्छिमारी साहित्य आणि नौका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर देण्यात आली आहे .
मालवण चिवला बिच येथे राहणारे आल्बट कामील फर्नांडिस यांची गिलनेटव्दारे मच्छिमारी करणारी नौका गेले पंधरा दिवस समुद्र किनाऱ्यावर उभी करून ठेवण्यात आली होती या नौकेत मच्छिमारीची जाळी, तसेच साहित्य होते रविवारी रात्री या नौकेला कोणीतरी आग लावली या आगीत नौका तसेच आतील जाळी जळत असताना परिसरातील स्थानिकांना जाग येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आल्बट फर्नांडिस यांना माहिती देण्यात आली. आग विझवीण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले मात्र नौका व आतील जाळी जळून गेली. या दरम्यान बाजूला एक नौका उभी होती त्याच्या इंजिनवर असलेल्या कपड्याला काही प्रमाणात आग लागली मात्र स्थानिकांनी ही आग विजविली
जळालेल्या नौकेच्या बाजूला मातीत कोणीतरी धावत जात असलेल्या स्थितीत मातीत पायाचे ठसे दिसून आल्याचे पोलीस खबरीत म्हटले आहे त्यामुळे आग लावून कोणीतरी धावत पळून गेले असावे. या दृष्टीने पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तर आजूबाजूला सिसिटीव्ही फुटेज मिळते का याचीही माहिती घेतली जात होती. याबाबत पोलिसात खबर देण्यात आली आहे
