⚡मालवण ता.३०-: आरमारी गाबीत समाजाच्यावतीने दिवाळी निमित्त मालवण तालुकास्तरावर किल्ले व आकाश कंदील स्पर्धा दि १३ नोव्हेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे
हि स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट १४ वर्षाखालील व दुसरा गट खुल्या गट अशी होणार आहे. स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ व आकाश कंदील हे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रू. ३,००१, रू.२,००१, रु. १,००१ रूपये रोख तसेच आरमारी गाबीत समाज स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे रु. २,००१, रु. १,००१, रु. ७०१ रूपये रोख तसेच आरमारी गाबीत समाज स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकाने आपली नावे श्री. दामाजी (बाळू) मेथर,मो. नं. ९४२२९६४१६३, सौ. स्वप्नाली बाबाजी तारी,मो न ९४२३२९२२४७, श्री. निशिकांत पराडकर, मो नं. ८९९९७४९१८५ यांच्याकडे दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावीत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आरमारी गाबीत समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश कुबल आणि पदाधिकारी यांनी केले आहे.
