मालवणमधील रामेश्वर – नारायण पालखी सोहळा १४ रोजी

⚡मालवण ता.३०-: मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी परिक्रमणा सोहळा मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.

या पालखी सोहळ्यात दुपारी १ वाजता मालवण देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून पालखी निघून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करुन आडवण मार्गे वायरी तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर, वायरी येथे थांबून समुद्र मार्गे मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबेल. त्यानंतर दांडी येथील दांडेश्वर मंदिरात भेट देऊन मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिर येथे भेट देऊन जोशी मांड, मेढा येथे पालखी थांबेल. त्यानंतर मालवण बंदर जेटी येथून पालखी सोमवार पेठेत दाखल होऊन श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांना दर्शनासाठी थांबेल. त्यानंतर रात्री उशिरा बाजारपेठ -भरड मार्गे पुन्हा देऊळवाडा येथे मंदिरात पालखी येईल. तरी या पालखी सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर, नारायण, सातेरी इ. देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page