वेशभूषा स्पर्धेत रेवा जोशी प्रथम:मालवण बंदर जेटी येथे गरबा नृत्य कार्यक्रम संपन्न..
⚡मालवण ता.२६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका तर्फे दसऱ्या दिवशी मालवण बंदर जेटी येथे आयोजित भव्य खुल्या गरबा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी करत गरबा नृत्याचा आनंद लुटला. तर यानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धा व लकी ड्रॉ स्पर्धेसही उत्तम प्रतिसाद लाभला. वेशभूषा स्पर्धेत रेवा जोशी (कालीमाता) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मनसे मालवण तालुक्या तर्फे सलग दुसऱ्या दिवशी दसऱ्या निमित्त मालवण बंदर जेटी येथे गरबा नृत्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते व माजी आमदार परशुराम उपरकर मालवणचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे तालुकाध्यक्ष संदिप लाड, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल, युवा कार्यकर्ते प्रितम गावडे, सौ. प्राजक्ता आढाव, भाग्यश्री लाकडे, जनार्दन आजगावकर, लौकिक अंधारी, साईश किर, तथागत मालवणकर, प्रशांत पराडकर, हर्षद परब, कुणाल माळवदे, वैभव आजगावकर, कुणाल चोडणेकर, सूरज मांजरेकर आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आकर्षक वेशभूषा साकारल्या. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – प्रथम रेवा जोशी (कालीमाता), द्वितीय प्रियांका लाड (महिशासूर), तृतीय भूषण आडारकर (कांतारा), उत्तेजनार्थ साहिल तोडणकर (कांतारा), साक्षी मोरजे (बानूबया).
यावेळी आयोजित गरबा नृत्यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमधून उत्तम नर्तकांची निवड करण्यात आली. यामध्ये पुरुष गट- प्रथम निक्सन परेरा, द्वितीय गणेश पेडणेकर, तृतीय निनाद मोंडकर. महिला गट – प्रथम करीना खराडे, द्वितीय रिया जामसंडेकर, तृतीय सिद्धी माणगावकर. ज्येष्ठ गट- सुधीर लोके, बाल गट – चित्रावली जोशी व स्पेशल चाईल्ड – पूजा यांनी क्रमांक मिळविले. तर लकी ड्रॉ स्पर्धेत संतोष इब्रामपूरकर यांनी एक नंबरचे पारितोषिक जिंकले. तसेच बक्षीस क्रमानुसार संदेश गावडे, दिलीप मांजरेकर, यशवंत भोवर, रजिया मुजावर, अनुष्का नरे, साईशा मेथर, संतोष शेलटकर, यशवंत गावकर, दिनकर मसुरकर, कांबळी, ऋतुजा शेलटकर, रतवी देऊलकर, देवांश तूळसकर, यतीन करवडकर, निल चिंदरकर, पार्थ राणे, अनिकेत केळूसकर, आस्था केळूसकर, गौरवी मयेकर, मोहन शिवलकर यांनी यश मिळविले.
वेशभूषा स्पर्धा व गरबा नृत्य स्पर्धेचे परीक्षण संजय केळूसकर यांनी केले. सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. यावेळी वेशभूषा व नृत्य स्पर्धा तसेच लकी ड्रॉ मधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
