शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती; पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती
⚡सावंतवाडी ता.२६-: येथील बॅ. नाथ पै इंदिरा गांधी येथे उद्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विज्ञान नाट्योत्सवाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दरम्यान यासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मित्र मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यामुळे हा महोत्सव दर्जेदार होणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी शुभाष चौगुले , अधिव्याख्याता प्रविण राठोड, विज्ञान पर्यंवेक्षक राजू नेट , सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ पांडुरंग काकतकर आदी उपस्थित होते.
