⚡मालवण ता.२६-: येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या विद्यार्थिनींचा कबड्डी संघ
अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयात मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत कबड्डी क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने गोगटे जोगळेकर व दापोली महाविद्यालय यांना पराभूत करून अंतिम फेरी गाठली तसेच या स्पर्धेमध्ये झोन क्रमांक चार अंतर्गत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स. का. पाटील महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ स्तरावर प्रथमच यश संपादन केले.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या वतीने दहा मुली सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षक हरिश्चंद्र साळुंखे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ.हंबीरराव चौगले यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली मुलींच्या संघाने हे यश संपादन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब पंतवालावलकर, सचिवचंद्रशेखर कुशे सर्व संस्था पदाधिकारी, जिमखाना विभाग डॉ. डी व्ही. हारगीले, प्रा.एम.आर.खोत तसेच इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
