किर्लोस येथील प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे 28 रोजी
कोजागिरी स्नेहमेळावा

⚡कणकवली ता.२६-: मालवण तालुक्यातील किर्लोस येथील प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यावतीने शनिवार २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ६ वा. कोजागिरी स्नेहमेळावा म्हणजेच देणे समाजाचे सोहळा कृतज्ञतेचा कार्यक्रम माधव गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
यावेळी मान्यवरांचे स्वागत, पुरस्कार वितरण सोहळा, सहस्त्रचंद्र दर्शन पुरस्कार,विशेष विद्यार्थी पुरस्कार (भजन सांप्रदाय)
किर्तन साधना पुरस्कार होणार असून सांस्कृतिक कार्यक्रममध्ये किर्तन, दिंडी भजन व गायन यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम 28 ऑक्टोंबर रोजी विजयालक्ष्मी मंगल कार्यालय, किर्लोस कषि विज्ञान केद्र, किर्लोस शेजारी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे .
यावेळी विशेष विद्यार्थी पुरस्कार (भजन सांप्रदाय ) तेजस मंगेश घाडीगावकर, भूषण मंगेश घाडीगावकर, विशाल सावंत, मंगेश दुखंडे, शेखर शरद गावकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. किर्तन साधना पुरस्कार असगणी येथील ह.भ. प. मृणाल मिलिंद गावकर तसेच पोखरण येथील ह.भ. प. सुपर्ण भाटवडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी सहस्त्रचंद्र दर्शन पुरस्कार शिरवंडे ,असरोंडी,आडवली , असगणी, राठीवडे, किर्लोस गावातील 25 नागरिकांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यावतीने गणेश बाक्रे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page