*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुका फोटो अँन्ड व्हिडीओ ग्राफर असोशियनच्या वतीने छायाचित्रकार संजय राणे यांची कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला . फोटो अँन्ड व्हिडीओ ग्राफर असोशियनचे उपाध्यक्ष विनायक पारधीये यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी संजय राणे म्हणाले , छायाचित्रकाराच्या रूपाने माझी सचिवपदी निवड झाल्याने एकाअर्थाने आपल्यासर्वाचा हा सन्मान आहे.पत्रकार समिती सोबतच तालुक्यातील फोटोग्राफर असोशियनचे प्रश्न देखील मार्गी लावण्याची ग्वाही त्यानी दिली . यावेळी उपाध्यक्ष विनायक पारधिये , सचिव कृष्णा कांबळी , खजिनदार योगेश चव्हाण , संतोष सावंत , राजू सोहनी , मारूती मेस्त्री , नितीन कुवळेकर , विनोद दळवी , सुरजित ढवण , सतू गुडेकर , अनिकेत उचले आदी उपस्थित होते .
कणकवली तालुका फोटोग्राफर असोशियनच्यावतीने संजय राणे यांचा सत्कार …
