महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती
*💫देवगड दि.१०-:* श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील जिओ टॉवरचे उद्घाटन उद्या आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वर येथे जिओची रेंज देऊ असे आश्वासन दिले होते. कुणकेश्वर येथे नेटवर्क समस्या निर्माण झाली होती याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या जवळ नेटवर्क टॉवरची मागणी केली होती, त्या मागणी प्रमाणे येथील जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता आमदार नितेश राणे यांनी केली आहे, सुसज्ज अशा जिओ नेटवर्क टॉवरचे लोकार्पण महाशिवरात्री दिनी गुरुवारी ११ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. कुणकेश्वर या धार्मिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाचा भाग म्हणून मोबाईल नेटवर्क भक्कम करण्याच्या उद्देशाने हा जिओ टॉवर उभारण्यात आला आहे.
