*जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध

*अध्यक्षपदी संजय वालावलकर तर सचिव पदी नंदकुमार आयरे यांची निवड*

सिंधूदुर्गनगरी ता १० सिंधूदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी संजय वालावलकर तर सचिवपदी नंदकुमार आयरे यांची निवड यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात जिल्हा पत्रकार संघाने नियुक्त केलेले निरीक्षक आनंद लोके व भरत सातोस्कर यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी पत्रकार समिती सदस्य व जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, सहसचिव देवयानी वरसकर, मावळते अध्यक्ष संदीप गावडे, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब, तेजस्वी काळसेकर, गिरीश परब, वेंगुर्ले पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत आदी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष म्हणून लवू म्हाडेश्वर, सहसचिव सतीश हरमलकर, खजिनदार दत्तप्रसाद वालावलकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष संजय वालावलकर यानी माझी अध्यक्षपदी निवड झाली असलीतरी पुढील कारभार सांभाळण्याची जबाबदारी सर्व सभासदांची आहे. मावळते अध्यक्ष संदीप गावडे यानी ‘सर्वांच्या सहकार्यामुळे आपण गेल्या चार वर्षात चांगले काम करता आले’, असे सांगितले. गणेश जेठे यानी ‘संदीप गावडे यानी सर्व तालूका अध्यक्षा पेक्षा सर्वोत्तम काम केले आहे’, असे सांगितले. निरीक्षक आनंद लोके व भरत सातोस्कर यानी ‘मुख्यालय पत्रकार संघाने तालुक्यातून येणाऱ्या पत्रकारांना सहकार्य करण्याची भूमिका नेहमी ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बाळ खडपकर, देवयानी वरसकर यानीही विचार व्यक्त केले. तसेच नवनियुक्त कार्यकारिणीने सुद्धा विचार मांडले.

You cannot copy content of this page