जिल्हा कॉंग्रेस कमिटीची १३ मार्च ला बैठक

*सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे जिल्हा चिटणीस राजेंद्र मसुरकर यांचे आवाहन

*💫सावंतवाडी दि..०९-:* ओरोस येथील कॉंग्रेस कार्यालयात १३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हा कॉंग्रेस कमिटीची सभा आयोजित करण्यात आली असून या बैठकीस जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी सदस्य, प्रांतिक प्रतिनिधी, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आजी माजी खासदार, लोकसभा विधानसभा उमेदवार, माजी जिल्हाध्यक्ष, फ्रंटल विभागाचे व विविध सेलचे जिल्हाध्यक्ष यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन कॉग्रेस जिल्हा चिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे. या बैठकीत जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुका , तसेच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका व तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

You cannot copy content of this page