ओरोस ता.०१-:
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने श्रमदानातून स्वच्छ्ता हा उपक्रम पोलीस ठाणे परिसरात राबविण्यात आला. यावेळी या ठाण्या अंतर्गत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आले.
रविवारी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वाजता या मुदतीत श्रमदानातून स्वच्छता या अभियान अंतर्गत पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, उपनिरीक्षक नितीन कदम तसेच पोलीस ठाणे येथील अंतर्गत कर्मचारी व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस पाटील श्री कदम आदी 18 ते 20 जण उपस्थित होते.
