मालवण तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाकडून गणेश भक्तांना सरबत वाटप…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहरात अनंत चतुर्दशी व अकराव्या दिवशी अनेक घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मालवण बंदर जेटी येथे उपस्थित असलेल्या गणेशभक्तांना मालवण तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सरदार ताजर व सहकारी यांच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले.

यावेळी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा पदाधिकारी बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, पल्लवी तारी, शहर अध्यक्ष श्रेयस माणगावकर, जेम्स फर्नांडिस, युवक काँग्रेस माजी अध्यक्ष महेश लुडबे, लक्ष्मीकांत परुळेकर, ममता तळगावकर, बाबा मेंडिस, सलाम मुजावर यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page