⚡मालवण ता.०१-: केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरावडा अंतर्गत येथील नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत आज राबविण्यात आलेल्या महाश्रमदान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मालवण येथील नगरपालिकेच्या वतीने आज एक तास एक साथ स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता श्रमदान राबवण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात माझी माती माझा देश च्या पंचप्राण शपथ घेऊन करण्यात आली तसेच स्वच्छता ही सेवा उपक्रम आणि स्वच्छता पंधरवडा अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये शहरातील विविध सेवाभावी संस्था व बँक कर्मचारी आणि सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी केली. स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सहभागी नागरिकांनी आपल्या स्वच्छता करतानाचा फोटो https://swachhatahiseva.com/ या संकेतस्थळावर अपलोड करून आपले सहभाग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
