गांधी जयंतीचे औचित्य;शालेय विद्यार्थ्यांनी देखील उस्फुर्त सहभाग दर्शवला..
⚡सावंतवाडी ता.०१-: स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सामाजिक संस्था, नागरिक याच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत उस्फुर्त सहभाग दर्शवला. तर शहरात ठिकठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली यातून मोठ्या प्रमाणात कचरा एकत्र करण्यात आला.
सावंतवाडी शहरात आयोजित करण्यात आलेल्या अभियानाला येथील गांधी चौकातून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील आठ प्रभागात पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सहभागी स्वच्छता दूतांनी संबंधित परिसराची स्वच्छता केली. तर मोती तलावा भोवती मानवी साखळी करून स्वच्छते संदर्भात घोषणा देत या उपक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी युवराज लखन सावंत-भासले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले, प्रांताधिकारी प्रशात पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, सुधीर आडीवरेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दिपाली भालेकर, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, आसावरी शिरोडकर, देविदास आडाकर, अक्षय पंडित, युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, आदींसह मोठ्या संख्येने राजकीय लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील नागरी आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत देशात “स्वच्छ भारत अभियान २०२३ राबविले जात आहे. दरम्यान २ ऑक्टोबरला होणाऱ्या गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबरला संपूर्ण देशात महास्वच्छता अभियान राबवून महात्मा गांधींनी स्वच्छते संदर्भात दिलेला संदेश जपत त्यांना स्वच्छतेतून आदरांजली देण्यात आली. सावंतवाडी पालिकेच्या स्वच्छता मोहीमेत धर्माधिकारी प्रतिष्ठान, समता महिला मंडळ, युवा रक्तदाता संघटना, लायन्स क्लब, तसेच आरपीडी कॉलेज, कळसुलकर कॉलेज, उर्दू शाळा आदी प्रशालेच्या शिक्षक विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने इतर अनेक सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या. या सर्व स्वच्छता दूतांच्या सहकार्याने सावंतवाडी शहरा करण्यात आली. त्यानंतर मोती तलावाच्या काठावर स्वच्छतेसंदर्भातील घोषणा देत या मोहिमेचा समारोप करण्यात आला. या संपूर्ण उपक्रमाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
तालुक्यात ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छता मोहीम
सावंतवाडी तालुक्यातही ग्रामपंचायत पातळीवर ही मोहीम घेण्यात आली ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये ग्रामपंचायतच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली.
