⚡सावंतवाडी ता.०१-: मळगाव सावलवाडा येथील दीपाली दशरथ हरमलकर 58 महिलेने घरालगत असलेल्या ओहोळात आत्महत्या केली. रविवारी सकाळी घटना उघडकीस आली.
आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे महीलेने लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिला काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ओहोळाच्या दिशेने जात असलेली काही लोकांनी पाहिली होती. काही कामानिमित्त जात असल्याचे त्यांना वाटले. उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने घरच्या मंडळींनी तसेच शेजाऱ्यानी शोधाशोध सुरू केली. मळगाव-सावळवाडा येथील ओहळावर घातलेल्या बंधाऱ्यालगत तिची चप्पल आढळून आली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केल्यानंतर ओहोळातील झुडपाला अडकलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
